आळेफाटा(पुणे) – मुलीचे अश्लील फोटो व्हायरल करायची धमकी देत 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना आळेफाटा ( ता जुन्नर) परिसरात घडली. यावेळी पीडित अल्पवयीन मुलीने गुरुवारी उशिरा रात्री (1 जुलै) उशिरा आळेफाटा पोलीस स्टेशन ला फिर्याद नोंदवली.
याप्रकरणी चार जणांना अटक केलेली असून एक आरोपी फरार आहे.ह्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून लोकांनी सदर संतापजनक प्रकाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
आळेफाटा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एका अल्पवयीन मुलीशी ( 14 वर्ष वय) ओळख करून तिच्या सोबत अश्लील फोटो काढून ते फोटो व्हायरल करायची धमकी देत पाच मित्रांनी गेले 2 वर्ष आळीपाळीने नगर रोड वरील एका लॉज वर 15 जून 2019 ते 15 जून 2021 दरम्यान वेगवेगळ्या गाड्यांमध्ये नेऊन बलात्कार केल्याची घटना समोर आलेली आहे. शिवाय पीडित अल्पवयीन मुलीच्या वडिलांना ही धमकी दिल्याची माहिती समोर येत आहे.
याप्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून निखिल पोटे, विकी पोटे, बंटी तितर, दया टेमगिरे, यश गाडेकर ( सर्वांचे वय 28 वर्ष पुढील) यांच्याविरुद्ध बलात्कार सह बाललैंगिक अत्याचार विरोधी कायद्यानुसार आळेफाटा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. पोलिसांनी चार आरोपींसह एक आलिशान वाहन ही ताब्यात घेतले आहे.आळेफाटा पोलीस निरीक्षक मधुकर पवार पुढील तपास करीत आहेत.