उंब्रज – कराड तालुक्यातील एका गावातील 28 वर्षीय युवतीवर बलात्कार केल्या प्रकरणी तानाजी विष्णू निकाळजे (वय 35) याला उंब्रज पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना मंगळवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी पीडितेच्या आईने फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पीडित युवती गावानजीकच्या ओढ्यात शौचासाठी गेली असता तानाजी निकाळजेने तिला उचलून शेजारी असलेल्या उसाच्या शेतात नेले. तेथे तिचे तोंड दाबून बलात्कार केला. या प्रकरणी उंब्रज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस उपनिरीक्षक एस. आय. तलबार तपास करत आहेत.