मराठी सिनेसृष्टीची अप्सरा ‘सोनाली कुलकर्णी’चा काल वाढदिवस होता. आपल्या उत्तम नृत्य शैलीने आणि वेगवेगळ्या भूमिकेने सोनालीने नेहमीच प्रेक्षकांच्या मनात आपले एक स्थान निर्माण केले आहे. लग्नाच्या आणि प्रेमप्रकरणाच्या चर्चांना पूर्णविराम देत तिने साखरपुडा झाल्यानंतर आपल्या जोडीदाराविषयी आपल्या चाहत्यांसोबत एक गोड बातमी शेअर केली आहे.
दुबईमध्ये राहणाऱ्या कुणाल बेनोडेकर याच्याशी सोनालीने 2 फेब्रुवारी रोजी साखरपुडा केला आहे. दरम्यान, साखरपुडा, लग्न हे सोहळे प्रत्येकाच्या आयुष्यात खूप खास असतात. या खास सोहळ्यांसाठी साजश्रृंगारसुद्धा तसाच केला जातो. अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने तिच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत