लॉकडाऊनमुळे बॉलिवूड सेलिब्रिटीजसह सर्वजण घरातच असल्याने सोशल मीडियावर अनेक जण ऍक्टिव्ह झाले आहेत. दिवसभरातील जास्तीत जास्त वेळ ते सोशल मीडियावर घालवत आहेत. या ट्रेंडमुळे सोशल मीडियावर अनेक जुने व्हिडीओ व्हायरल असल्याचे दिसून येत आहे.
नुकताच रणवीर सिंह आणि रणबीर कपूर यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका टेबलावर दोघांमधील डान्सची जबरदस्त जुगलबंदी दिसत आहेत.
View this post on Instagram
When Ranveer & Ranbir danced their hearts out at a party😍 . . #RanveerSingh #RanbirKapoor
सोशल मीडियावर रणवीर सिंह आणि रणबीर कपूर यांचा एका पार्टीमधील व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये हे दोघेही पार्टीत जबरदस्त मस्तीच्या मूडमध्ये असल्याचे दिसते. हे दोघे एका टेबलावर चढून बिनधास्त डान्स करत आहेत. या व्हिडीओतील आवाजावरून रणबीर कपूर आणि दीपिका पादुकोणच्या “ये जवानी है दिवानी’ या चित्रपटातील “बदतमीज दिल’ या गाण्यावर डान्स करत असल्याचे दिसते.
तसेच व्हिडीओमध्ये त्यांच्या आसपास अनेक लोक दिसत असून ते दोघे चित्रपटाच्या शैलीत एका टेबलवर मजेदार डान्स करताना दिसतात. तसेच “बदतमीज दिल’च्या हुक स्टेप करण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसते.
विशेष म्हणजे, यात रणबीर कपूर-रणवीर सिंहची जबरदस्त जुगलबंदी दिसून येते. यामुळे हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. दरम्यान, रणबीर कपूर आणि रणवीर सिंह हे दोघे चांगले मित्र असून अनेक पार्टीमध्ये त्यांना स्पॉट करण्यात आलेले आहे.