नवी दिल्ली – रणवीरचा बहुप्रतिक्षीत 83 चित्रपट लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ’83’ चा फर्स्ट लूक समोर येताच लोकांमध्ये उत्साह बघायला मिळाला होता. या चित्रपटाचा ट्रेलर समोर येताच लोकांनी रणवीर आणि इतर कलाकारांचे कौतुक केले. या चित्रपटात रणवीर सिंग कपिल देवच्या भूमिकेत पूर्णपणे स्थिरावलेला दिसत आहे. त्याच्या अभिनयाची आणि कबीर खानच्या दिग्दर्शनाची जबरदस्त चर्चा आहे. हा चित्रपट 24 डिसेंबरला सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी दिल्ली सरकारने चित्रपट निर्माते आणि चाहत्यांसाठी एक चांगली बातमी दिली आहे.
View this post on Instagram
आता देशाची राजधानी दिल्लीत 83 हा चित्रपट करमुक्त घोषित करण्यात आला आहे. 1983 मध्ये कपिल देव आणि भारतीय क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकून इतिहास रचला होता. आता रणवीर सिंग त्याच आठवणी पुन्हा एकदा पडद्यावर ताज्या करताना दिसणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे स्क्रिनिंग आयोजित करण्यात आले होते, जिथे स्टार्सनी चित्रपटाचे आणि रणवीर सिंगसह इतर कलाकारांचे कौतुक केले.
अरविंद केजरीवाल यांचे आभार मानत कबीर यांनी लिहिले, दिल्लीत 83 करमुक्त केल्याबद्दल श्री अरविंद केजरीवाल आणि श्री मनीष सिसोदिया जी यांचे आभार! तुमची महानता आम्हाला भारताचा सर्वात मोठा विजय अधिक प्रेक्षकांपर्यंत नेण्यात मदत करेल. अशा शब्दात कबीर खान यांनी यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे आभार मानले आहे.