नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आज संध्याकाळी 6 वाजता पार पडणार आहे. सध्या मोदी कॅबिनेटमध्ये अनेक ज्येष्ठ मंत्र्यांवर अधिकच्या खात्यांचा प्रभार आहे. त्यांच्यावरील जबाबदारी कमी करुन नव्या चेहऱ्यांकडे हा कार्यभार दिला जाणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातून राज्यसभा खासदार आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची मंत्रीपदी वर्णी लागली आहे. मंत्रिमंडळ विस्ताराच्या यादीत राणे यांचं नाव अव्वलस्थानी आहे.
नारायण राणे यांच्यासह महाराष्ट्रातून पंतप्रधान मोदींच्या मंत्रिमंडळात चार नेत्यांची वर्णी लागली आहे. यामध्ये भागवत कराड, भारती पवार आण कपिल पाटील यांच्या नावाचा समावेश असल्याचं समजतं.
Union Cabinet Expansion : मोदी सरकारच्या मंत्रिमंडळातील
नव्या सदस्यांची यादी pic.twitter.com/GjYQAXQzqU— Digital Prabhat (@Dainik_Prabhat) July 7, 2021
नव्या मंत्रिमंडळासाठीच्या संभाव्य 43 मंत्र्यांची यादी समोर आली आहे. या यादीत नारायण राणे पहिल्या स्थानी दिसून येत आहे. राणे यांचे मुंबई आणि कोकणात चांगलं नेटवर्क आहे. तसेच शिवसेनेविरुद्ध ते कायम आक्रमक भूमिका घेत आले आहेत. राज्यात शिवसेनेला शह देण्यासाठी राणे यांची भाजपला मोठी मदत होऊ शकते, असाही एक मतप्रवाह आहे.