अभिनेता रणबीर कपूर व श्रद्धा कपूर लवकरच स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत. दोघे सध्या स्पेनमध्ये लव्ह रंजन यांच्या एका चित्रपटासाठी चित्रीकरणामध्ये व्यस्त आहेत. या चित्रपटाचे नाव अद्याप समोर आले नसले तरी स्पेनमध्ये सुरु असलेल्या शुटिंगचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर लीक झाला आहे. या व्हिडिओमध्ये रणबीर व श्रद्धा एका गाण्यासाठी शूट करताना दिसत आहेत. इंस्टाग्रामवर रणबीर कपूरच्या एका फॅन पेजवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.
व्हिडिओमध्ये आकाशी रंगाचा शर्ट व पांढरी पॅन्ट परिधान केलेला रणबीर कोरिओग्राफरकडून गाण्याचे मूव्ह्स शिकतोय. तर पायात व्हाईट कॅनव्हास व यलो शॉर्ट ड्रेस परिधान केलेली श्रद्धा छत्रीखाली उभी राहून डान्स स्टेप्सचे निरीक्षण करत आहे. रणबीर व श्रद्धा यांची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट रोमँटिक-कोमिडी असल्याचे कळते. या चित्रपटातून दोघे प्रथमच मोठ्या पडद्यावर एकत्र झळकणार आहेत. डिंपल कपाडिया यांचीही भूमिका असलेल्या या चित्रपटातून निर्माता बोनी कपूर अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार असल्याचंही कळतंय.
वर्क फ्रंटबाबत बोलायचं झाल्यास रणबीर कपूर सध्या ब्रह्मास्त्र पार्ट वन : शिवाच्या रिलीजसाठी तयारी करत आहे. यामध्ये त्याची पत्नी आलिया भट्ट लीड रोलमध्ये आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन, नागार्जुन अक्किनेनी आणि मौनी रॉय यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट 9 सप्टेंबर 2022 रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे.
दुसरीकडे श्रद्धा कपूर सध्या नुकतीच बागी – ३ चित्रपटामध्ये झळकली होती. यानंतर ती नागीण चित्रपटामध्ये भूमिका साकारणार असल्य्याच बोललं जातंय.