रणबीर कपूर हा बॉलीवूडचा चॉकलेटबॉय समजला जातो. तो लहानपणी खूपच क्यूट दिसायचा. आजही दिसतो, परंतु बालपणी खूपच क्यूट होता आणि त्याचे पुरावेही पाहवयास मिळतील. प्रत्यक्षात रणबीर कपूरचा एक दिलखेचक फोटो व्हायरल होत आहे.
चाहत्यांना त्याचा फोटो खूपच भावला. हा फोटो फॅमिली अल्बममधून काढला आहे. काही दिवसांपूर्वी हाच फॅमिली फोटो करिष्मा कपूरने शेअर केला होता. रणबीर कपूरचा फोटो पाहून आलिया भट्ट देखील त्याच्या प्रेमात पडली. सूत्रानुसार रणबीर हा सध्या आलियाबरोबर राहत आहे. या चर्चेला पुष्टी देणारा दोघांचाही व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. यात ते दोघे आपल्या पेटबरोबर वॉकिंग करायला जाताना दिसतात.