नेवासा – नेवासा तालुक्यातील भेंडा येथील श्रीराम सेवा मंडळाचे १० रामभक्त रविवारी अयोध्येला रवाना झाले. बापूसाहेब नजन, किशोर सुकाळकर, वाल्मीक लिंगायत, किशोर मिसाळ, राजेंद्र तागड, विश्वास कोकणे, समाधान शेलार,राहुल शिंदे, कैलास नवले, तात्या फुलमाळी हे रामभक्त विमानाने मार्गस्थ झाले.
“प्रभू रामचंद्राच्या प्राण प्रतिष्ठापनेसाठी शिर्डीहून विमानाने आज दुपारी चार वाजता प्रस्थान करून लखनऊ येथे उतरले. तेथून अयोध्या येथे जाण्यासाठी खासगी वाहनाने प्रवास करणार आहो,अशी माहिती श्रीराम सेवा मंडळाचे संयोजक बापूसाहेब नजन यांनी दिली. राम भक्तांना शुभेच्छा व निरोप देण्यासाठी नेवासा फाटा येथील राजमुद्रा चौकात मुकिंदपुरचे सरपंच सतीश निपुंगे,ग्रामपंचायत सदस्य भरत काळे, बाळासाहेब सुकाळकर, भाजपचे रितेश कराळे,अमोल घोडके, सुभाष पंडित आदी मान्यवरांनी रामभक्तांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार केला.