पॉलिटेक्‍निक अर्ज भरताना तांत्रिक अडथळे

लिंकच खुली होईना : विद्यार्थी, पालकांना मनस्ताप

पुणे – दहावी व बारावीनंतरच्या पदविका अभियांत्रिकी (डिप्लोमा) अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज करताना प्रवेशाची लिंकच खुली होत नव्हती. तांत्रिक अडचणीमुळे संकेतस्थळ दिवसभर बंद होते. परिणामी, पदविका अभियांत्रिकीसाठी विद्यार्थ्यांना अर्ज भरता आले नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थी व पालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला आहे.

पदविका अभ्यासक्रमांसाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी संकेतस्थळ देण्यात आले होते. त्या संकेतस्थळावर क्‍लिक केल्यास, त्यावरील लिंक बंद होती. संगणक प्रणालीत सुधारणा करण्यात येत असून, लवकरच अर्ज करण्यासाठी लिंक खुली होईल, असे संदेश त्यावर दिसून येत होता. मात्र सकाळपासून सायंकाळ सहापर्यंत संकेतस्थळ खुले झाले नाही. त्याचाच परिणाम म्हणून अनेक विद्यार्थ्यांना अर्ज करता आले नाही.

ऑनलाइन अर्ज करताना विद्यार्थ्यांना कागदपत्रे अपलोडही करावी लागणार आहेत. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सुविधा केंद्रातून कागदपत्राची पडताळणी करून घ्यावी लागते.
त्यासाठी शेकडो विद्यार्थी सुविधा केंद्र असलेल्या पुण्यातील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात आले होते. मात्र, याठिकाणी सॉप्टवेअरमध्ये बिघाड झाल्याने ही सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यास अडचणी येत होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.

दरम्यान, सायंकाळी 5 वाजता संकेतस्थळ सुरू झाले. त्यानंतर कागदपत्राची पडताळणीची प्रक्रिया सुरू झाली. मात्र आता संकेतस्थळ सुरू होणार नाही, असे गृहित धरून अनेक विद्यार्थ्यांनी घरी जाणे पसंत केले. गर्दी लक्षात घेता या सुविधा केंद्रात टोकन पद्धत सुरू करण्यात आली. त्यानुसार ज्यांचे पडताळणी झाली नाही, त्यांना टोकनद्वारे उद्या पडताळणी केली जाणार असल्याचे पॉलिटेक्‍निक महाविद्यालयांकडून सांगण्यात आले.

अर्जासाठी मुदतवाढ हवी
दहावीनंतर पदविका अभ्यासक्रमास अर्ज करण्यास एक दिवसाचा कालावधी राहिला आहे. तर बारावीनंतरच्या पदविका अभ्यासक्रम प्रवेशासाठी अर्ज करण्यासाठी दोन दिवस राहिले आहेत. अशा परिस्थितीत तांत्रिक कारणाने अनेक विद्यार्थी अर्ज भरू शकले नाहीत. त्यामुळे डिप्लोमा प्रवेशासाठी मुदतवाढ मिळावी, अशी मागणी विद्यार्थी व पालकांनी केली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)