पोलीस अधीक्षकांना दिले अवैध धंद्याबाबत निवेदन
वाघोली (प्रतिनिधी) – जागतिक महिला दिन 8 मार्च रोजी वाघोली येथे संतुलन महिला परिषदेच्या वतीने रॅली काढण्यात येणार आहे. केसनंद फाटा येथून रॅली निघणार असून मागील वर्षीप्रमाणे अवैध धंद्यांवर हल्ला होण्याची शक्यता असल्याने अवैध धंद्यांवर सर्जिकल स्ट्राइकप्रमाणे कारवाई करण्याचे निवेदन महिलांनी पोलीस अधीक्षकांना दिले आहे.
मागील वर्षी महिला दिनाच्या दिवशी वाघोलीत महिलांच्या निघालेल्या रॅलीने उग्र रूप धारण करून बाजारतळ परिसरातील अवैध दारू धंदे उद्ध्वस्त केले होते. यावर्षी देखील महिलांची रॅली केसनंद फाटा येथून सुरु होणार असून अवैध धंद्यांवर महिला हल्ला करण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी कारवाई करावी अशा मागणीचे निवेदन संतुलन महिला परिषदेच्या अध्यक्षा पल्लवी रेगे यांच्यासह वाघोलीतील महिलांनी पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांना दिले आहे.