बॉलीवूड आणि दक्षिणात्य सिनेमांमधून नावाजलेली अभिनेत्री रकुलप्रीत सिंगचा आज 31 वा वाढदिवस आहे. तिने आपल्या वाढदिवसाच्या दिवशी निर्माता जॅकी भगनानीबरोबरच्या आपल्या रिलेशनवर शिक्कामोर्तब केले आहे.
रकुलप्रीतने ही घोषणा केल्यावर सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. विशेषतः रकुलच्या फॅन्सना तर यावर विश्वासच बसत नाही आहे. रकुलने जॅकीबरोबरचा एक फोटो शेअर केला आहे आणि एक स्वीट नोटदेखील लिहिली आहे. “तुम्ही माझ्यासाठी या वर्षातील सर्वात मोठे गिफ्ट आहात.
View this post on Instagram
माझ्या आयुष्यात रंग भरण्यासाठी खरोखर थॅंक्यू. तुम्ही जसे आहात तसेच राहण्यासाठी थॅंक्यू. तुमच्याबरोबर आणखीन खूप आठवणी तयार करायच्या आहेत जॅकी भगनानी.’ असे रकुलप्रीतने आपल्या स्वीट नोटमध्ये म्हटले आहे. जॅकी भगनानीनेही तोच फोटो शेअर केला आहे.
“तुझ्याशिवाय दिवस दिवसासारखा वाटत नाही. तुझ्याशिवाय चविष्ट भोजनदेखील बेचव लागते. परमेश्वर तुझा दिवस इतका सुंदर बनवू देत जितकी सुंदर तू आहेस.’ अशा शब्दात जॅकीने रकुलप्रीतला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. रकुलप्रीत अर्जुन कपूरबरोबर “सरदार का ग्रॅन्डसन’मध्ये दिसली होती. आता “डॉक्टरजी’, “अटॅक’, “भेडे’ आणि “थॅंक गॉड’मध्येही ती दिसणार आहे.