पुणे – रक्षाबंधनाच्या निमित्ताने भाऊ बहिणीला ओवाळणी देतो. बहिणीची आवड, छंद, पॅशन अशा विविध बाबींसह बहिणीला उपयोग होईल, असे आकर्षक बाजारपेठेतील “भारी’ आणि “हटके’ गिफ्ट घेण्याकडे प्रत्येकाचा कल दिसून येतो. अनेकदा भावाच्या मनात गिफ्ट घेताना संभ्रम असतो. त्यामुळे “ट्रेन्डी’ भेटवस्तूंचा दै. “प्रभात’ ने घेतलेला आढावा.
सध्याच्या “ट्रेन्ड’नुसार “गिफ्ट’ दिल्यास बहिण नक्कीच “खूश’ होऊ शकते. आजकालच्या रेडिमेडच्या काळात हॅन्डमेड गिफ्ट भाव खाऊन जातात. “डिजिटल’च्या युगात बहिणीला देण्यासाठी “स्मार्टफोन’, “हेडसेट’, “स्मार्ट वॉच’, “ग्रीटिंग कार्ड’चे भरपूर पर्याय “ऑनलाइन’ आणि बाजारपेठांमध्ये उपलब्ध आहेत. यांसह घड्याळ, पेन, कॉफी मग, दागिने, ज्वेलरी बॉक्स, सिव्हर कॉईन, कुशन्स, पुस्तके, मेकअप कीट, पेन स्टॅन्ड, डायरी, किचेन्स, कॉस्मेटिक्स, टी-शर्ट, मोबाईल कव्हर असे एक ना अनेक “गिफ्ट’ बहिणीला नक्कीच आवडतील.