नवी दिल्ली – कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांची प्रकृती पुन्हा बिघडली आहे. 10 ऑगस्टपासून ते दिल्लीच्या एम्समध्ये दाखल आहेत. श्रीवास्तव यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. 10 ऑगस्ट रोजी राजू श्रीवास्तव जिममध्ये वर्कआउट करत असताना अचानक बेशुद्ध पडले. यानंतर त्यांना दिल्ली एम्समध्ये दाखल करण्यात आले होते.
ब्रेनडेड झाल्याचे डाॅक्टरांनी स्पष्ट केल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, श्रीवास्तव यांचे संर्व कुटुंबीय दिल्लीतील एम्स रुग्णालयात आहेत. त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करत आहेत.
श्रीवास्तव यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांची प्रकृती स्थिर झाली होती. ते उपचारांना प्रतिसाद देत होते. त्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवरून काढण्यात आले होते. मात्र पुन्हा अचानक त्यांची परिस्थिती खालावत असून ते उपचारांना प्रतिसाद देत नसल्याचे डाॅक्टरांनी सांगितले आहे. त्यांना पुन्हा व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.
13 ऑगस्टला त्यांचा एमआरआय काढण्यात आला होता. त्यामध्ये त्यांच्या मेंदूमध्ये काळे डाग आढळून आले होते. म्हणजे त्यांच्या मेंदूला इजा झाल्याचे डाॅंक्टरांनी सांगितले होते. डाॅक्टरांनी श्रीवास्तव यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितल्यानंतर देशभरातील चाहते त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करत आहेत.