राजू शेट्टी नीती आयोगावर भडकले !

कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी नीती आयोगाच्या सदस्यांवर चांगलीच तोफ डागली आहे. नीती आयोगाच्या विद्वानांनी केंद्र सरकारला ज्या शिफारशी केल्यात त्या शिफारशी म्हणजे उंटावरचा शहाण्याने केलेल्या शिफारशी आहेत असा टोला राजू शेट्टी यांनी लगावला आहे.

दरम्यान जमिनीशी संबंध नसलेली माणसं निती आयोगात गेल्यावर अशा माकड चेष्टा होतात अस म्हणत शेट्टी उसाच क्षेत्र कमी करण्यासाठी 6 हजार रुपयांच्या अनुदान आणि उत्पादित ऊसा पैकी 85 टक्के ऊस करखान्यानी स्वीकारन्याच बंधन या दोन्ही शिफारसी व्यावहारिक नाहीत असही त्यांनी म्हटलं आहे. माणसांचं वजन वाढतं म्हणून हात-पाय तोडून टाकतात का? असा सवाल करत शेतकरी उसाच्या शेतीकडे का वळतो याचा अभ्यास करा असा सल्ला नीती आयोगाला दिलाय.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.