नवी दिल्ली -संरक्षणमंत्री राजनाथ सिंह येत्या शुक्रवारी लडाख भेटीवर जाण्याची शक्यता आहे. त्या भेटीतून कुरापतखोर चीनला थेट संदेश जाणार आहे. लडाख भेटीत राजनाथ भारतीय सशस्त्र दलांच्या सज्जतेचा आढावा घेतील. त्यासाठी त्यांच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांशी उच्चस्तरीय बैठका होतील.
राजनाथ यांच्या भेटीमुळे चीनी कुरापतींची अतिशय गंभीर दखल भारताने घेतली असल्याचे अधोरेखित होईल.