Entertainment : बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानच्या (ShahRukh Khan) ‘डंकी’ या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहात आहे. जवान, पठाण या सुपरहिट चित्रपटानंतर शाहरुख त्याच्या नव्या चित्रपटासाठी सज्ज झाला आहे. येत्या 21 डिसेंबर रोजी हा सिनेमा रिलीज होणार आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार हिरानी (Rajkumar Hirani) यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.
मात्र, हा चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच राजकुमारने त्यांच्या पहिल्या वेब सीरिजवर काम सुरू केले आहे. राजकुमार सायबर सुरक्षेशी संबंधित विषयावर वेब सीरिज बनवत आहे. शाहरुख हा पहिल्यांदाच राजकुमार हिरानी यांच्या डंकी मध्ये काम करताना दिसणार असल्याचे म्हंटले जात आहे. विक्रांत पुढील वर्षी जानेवारीच्या मध्यापासून शोचे शूटिंग सुरू करेल. सुमारे दोन महिन्यांच्या शेड्यूलमध्ये संपूर्ण शो शूट करण्याची टीमची योजना आहे. हिरानी या मालिकेचे दिग्दर्शन करणार नाही तर ते त्याच्या निर्मात्याच्या भूमिकेत दिसणार आहे.
शोच्या दिग्दर्शनाची धुरा अमित सत्यवीर सिंग यांच्याकडे असणार आहे. अमितने याआधी अनेक जाहिरात चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. जर सर्व काही योजनेनुसार झाले तर, विक्रांत पुढील वर्षी जानेवारीच्या मध्यापासून शोचे शूटिंग सुरू करणार असल्याचे म्हंटले जात आहे. त्यात विक्रांत त्यात सायबर सुरक्षा तज्ञाच्या भूमिकेत दिसणार आहे.
यापूर्वी विक्रांत मेस्सीच्या12 वी फेल चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. त्यानं बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली होती. त्यानंतर तो आता हिरानी यांच्या मालिकेत दिसणार आहे. मिर्झापूर, ब्रोकन बट ब्यूटीफुल आणि क्रिमिनल जस्टिसनंतर विक्रांतची ही चौथी वेब सिरीज असणार आहे. याशिवाय त्याने ‘हसीन दिलरुबा’, ‘लव हॉस्टल’, ‘छपाक’ त्याचप्रमाणे ‘दिल धडकने दो’ यासांरखे चित्रपटांमध्येही काम केले आहे.