राजगुरूनगर – चाकण पोलिसांकडून दुचाकी चोरीचे पाच गुन्हे व एक घरफोडीचा गुन्ह्याची उकल झाली असून एका सराईत गुन्हेगारास पोलिसांनी अटक केली आहे. सागर गणेश खरात (वय 24) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. त्याच्याकडून सहा गुन्ह्यांची उकल झालेली असून मोटार सायकल (दुचाकी) चोरी करणारा तो सराईत चोरटा असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर आयुक्त संजय शिंदे, उप आयुक्त, परिमंडळ- 1 चे मंचक इप्पर, सहायक आयुक्त प्रेरणा कटटे याच्या सुचना व मार्गदर्शना खाली वरिष्ठ निरीक्षक वैभव शिंगारे, निरीक्षक अनिल देवडे, सहायक निरीक्षक विक्रम गायकवाड, उपनिरीक्षक सोमनाथ झेंडे, सहायक फौजदार सुरेश हिंगे, पोलीस हवालदार संदीप सोनवणे, ऋषीकुमार झनकर, राजू जाधव, पोलीस नाईक भैरोबा यादव, हनुमंत कांबळे, मनोज साबळे, मच्छिंद्र भांबुरे, निखील शेटे, पोलीस कॉस्टेबल निखील वर्पे, प्रदीप राळे, नितीन गुंजाळ यांनी केली आहे.