Live Cricket Score, RR vs RCB Indian Premier League 2024 : आज, IPL 2024 च्या 19 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) सोबत होत आहे. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. या सामन्यास संध्याकाळी 7.30 वाजता सुरूवात होईल.
आरसीबीची या मोसमात आतापर्यंतची कामगिरी काही विशेष ठरली नाही आणि त्यांनी आतापर्यंत चारपैकी केवळ एकच सामना जिंकला आहे, तर राजस्थानचा संघ सध्या स्पर्धेत अपराजित आहे आणि त्यांनी आतापर्यंतचे तिन्ही सामने जिंकले आहेत.
तत्पूर्वी, झालेला नाणेफेकीचा (Toss) कौल हा राजस्थान रॉयल्स संघाच्या बाजूनं लागला आहे. राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक (Toss) जिंकून रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) विरुद्ध प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
🚨 Toss Update 🚨
Rajasthan Royals win the toss and elect to field against Royal Challengers Bengaluru.
Follow the Match ▶️ https://t.co/IqTifedknm#TATAIPL | #RRvRCB pic.twitter.com/5l5wvoXLMM
— IndianPremierLeague (@IPL) April 6, 2024
दरम्यान, आयपीएलच्या इतिहासात राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे संघ एकूण 30 वेळा आमनेसामने आले आहेत. यामध्ये आरसीबीने 15 वेळा आरआरचा पराभव केला आहे. तर, आरआरने 12 वेळा सामने जिंकले आहेत. दोघांमधील 3 सामने अनिर्णित राहिले आहेत.