दारू पार्टीवर काँग्रेसच्या महिला आमदार म्हणाल्या… थोडी तर घेतली आहे, काय झालं सर्वच पितात

जोधपूर – राजस्थानच्या जोधपूरमध्ये दारूच्या नशेत गाडी चालवल्याबद्दल एका महिला आमदाराच्या नातेवाईकाचे चालान कापण्यात आले. ही बाब जेव्हा आमदाराच्या कानावर पडली तेव्हा आमदाराने पोलिसांना फोन करत नातेवाईकास सोडून देण्यात सांगितले. मात्र पोलिसांनी सोडण्यास नकार दिला त्यामुळे या महिला आमदाराने आपल्या पतीसह पोलिस स्टेशन गाठले.

पोलिस स्टेशनमध्ये पोहचल्यावर आमदाराने पोलिसांनाच सुनावत म्हणाल्या प्रत्येकाची मुले दारू पितात, काय झालं त्याने सुद्दा थोडी घेतली तर? असा सवाल या महिला आमदाराने केला. यानंतर या घटनेचा व्हिडिओ समोर आला असून यावर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.

मीना कंवर असे या महिला आमदाराचे नाव असून त्या शेरगढ येथील काँग्रेसच्या आमदार आहेत. ही घटना जोदपूर येथील रातानाडा पोलिस स्टेशन हद्दीत घडली आहे. शेरगढच्या कॉंग्रेस आमदार मीना कंवर यांचे नातेवाईक रात्री उशीरा पर्यंत दारू पिऊन गाडी चालवत असल्याकारणाने पोलिसांनी त्यांना दंड आकारला व पोलिस त्यांना स्टेशन मध्ये घेऊन गेले. जेव्हा आमदारास ही घटना कळाली तेव्हा त्यांनी पोलिसांना फोन करत नातेवाईकांना सोडून देण्यात सांगितले. मात्र पोलिसांनी त्यांना सोडण्यास नकार दिला.

पोलिसांनी नकार दिल्यानंतर आमदार मीना कंवर आपल्या पतीसह थेट पोलीस ठाण्यात गेल्या आणि स्वतःची ओळख करून दिली. त्यानंतर सुद्धा पोलिसांनी नातेवाईकांना सोडले नाही तेव्हा आमदार स्टेशनमधेच जमीनीवर बसल्या पोलिसांनी या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ बनवला. सांगितले जात आहे की त्यांनी व्हिडिओसंदर्भात पोलिसांना धमकीही दिली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.