शहर परिसरात पावसाची शक्‍यता

पुणे – शहर आणि परिसरात बुधवारी पावसाची शक्‍यता हवामान विभागाने वर्तविली आहे. रविवारपर्यंत पावसाची शक्‍यता 51 ते 75 टक्के असून उन्हाचा चटका वाढल्याने बाष्पीभवनाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे ढगांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे.

राज्यातील बहुतांश भागांत गेले दोन दिवस वादळी पावसाने उसंत घेतली आहे. सोबतच ऑक्‍टोबर हीट जाणवत आहे. काही भागांत मान्सून परतला असतानाच गुरुवारपासून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा विदर्भात वादळी पावसाची शक्‍यता आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.