राज्यात पाऊस जोर धरणार; पुण्यात अतिवृष्टीचा इशारा

पुणे – बंगालच्या उपसारागता कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. या कमी दाबाची तीव्रता वाढत असल्याने राज्यात पावसाची पूरक परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्यात पाऊस जोर धरणार आहे. दरम्यान, जिल्ह्यातही पुढील सहा दिवस मध्यम स्वरुपाचा सरी पडण्याची शक्‍यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

राज्यात मागील चार दिवसांपासून कोकण, मुंबई, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, अहमदनगर, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस झाला आहे. यामुळे आता पेरण्यांच्या कामाला वेग आला आहे. पुणे जिल्ह्यातील धरण क्षेत्रातही पावसाची संततधार सुरू आहे.

मंगळवारी आणि बुधवारी संपूर्ण राज्यात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्‍यता आहे. त्याचबरोबर गुरुवारी विदर्भात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्‍यता आहे. शहरात दि. 1 जूनपासून 202 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. तर लोहगाव येथे 200 मिमी आणि पाषाण येथे 227 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. मागील 24 तासांत कोकण-गोव्यात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी झाली. मध्य महाराष्ट्र व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. मागील 24 तासांत ताम्हिणी येथे 15 मिमी, कोयना येथे 11 मिमी, खोपोली येथे 9 मिमी, लोणावळा येथे 4 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

पुण्यात येत्या काही तासांत अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. तरी सर्व पुणेकरांना आवाहन आहे की योग्य ती खबरदारी घ्यावी आणि आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडणे टाळावे. आपत्कालीन परस्थितीमध्ये जवळच्या पोलिस अथवा अग्निशमन केंद्र अथवा एनडीआरफ केंद्राशी संपर्क साधा.

पुणे मनपा आपत्कालीन कक्ष – 02025501000

Leave A Reply

Your email address will not be published.