पुणे – शहर परिसरात आगामी तीन दिवस मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तर, पुणे जिल्ह्याला 15 सप्टेंबरपर्यंत पावसाचा “ऑरेंज’ अलर्ट देण्यात आला आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होऊन ते पूर्व-उत्तर दिशेने सरकत आहे. येत्या काही तासांत या कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. कोकण किनारपट्टी भागावर पावसाचे दाट ढग असल्याचे सॅटेलाइट छायाचित्रांच्या माध्यमातून दिसून येत आहे. परिणामी, राज्यात पावसासाठी पोषक वातावरण आहे. त्यामुळे आगामी तीन दिवस पुण्यासह मध्य महाराष्ट्रातील काही जिल्हे, किनारी भागांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
शहरात मध्यम पाऊस
दरम्यान, शहर परिसरात शनिवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. तसेच पावसाच्या मध्यम सरींनीदेखील अधूनमधून हजेरी लावली. विभागाच्या नोंदीनुसार शनिवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत शहरात शिवाजीनगर येथे .. मिमी, पाषाण येथे.. मिमी तर लोहगाव येथे.. मिमी पावसाची नोंद झाली आहे.