पुणे – देशभरातील स्टेशन मास्तरांनी विविध मागण्यांसाठी चारवेळा आंदोलन करुनही रेल्वे प्रशासनने गंभीर दखल घेतली नाही. त्यामुळे स्टेशन मास्तर संघटना आक्रमक झाली आहे. देशभरातील ३५ हजार स्टेशन मास्तर एक दिवसाचे अन्नत्याग आंदाेलन करणार आहेत.
पुणे विभागातील ३५० स्टेशन मास्तर यांनी गुरुवारी पुणे रेल्वे स्टेशन जवळील रेल मंडल कार्यालय (डीआरएम ऑफीस) येथे अन्नत्याग आंदोलन सुरु केले आहे.