RRC ECR Apprentice Recruitment 2023: रेल्वे भर्ती सेल (RRC), पूर्व मध्य रेल्वे (ECR) ने विविध ट्रेड्ससाठी 1,832 शिकाऊ (Apprentice ) उमेदवारांच्या जागा जाहीर केल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट actappt.rrcecr.in वर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख ०९ डिसेंबर २०२३ सायंकाळी ५ वाजेपर्यंत आहे.
RRC ECR शिकाऊ (Apprentice ) वय मर्यादा
उमेदवारांचे वय 15 ते 24 वर्षे असावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना उच्च वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे.
अर्ज फी
पूर्व मध्य रेल्वेद्वारे विविध पदांवरील शिकाऊ भरतीसाठी अर्ज शुल्क 100 रुपये आहे.
RRC ECR निवड प्रक्रिया
अप्रेंटिसशिप प्रशिक्षणासाठी उमेदवारांची निवड इयत्ता 10वी (किमान 50 टक्के गुण) आणि ITI परीक्षेत मिळालेले गुण लक्षात घेऊन तयार केलेल्या गुणवत्ता यादीवर आधारित असेल. दहावी आणि आयटीआय या दोन्ही परीक्षांना समान महत्त्व दिले जाईल.
दहावीच्या गुणांची गणना करण्यासाठी विषयांच्या गटाऐवजी सर्व विषय विचारात घेतले जातील. जर दोन उमेदवारांची गुणवत्तेची रँक समान असेल, तर त्यापेक्षा जास्त वय असलेल्याला प्राधान्य दिले जाईल. वय समान असल्यास दहावी प्रथम उत्तीर्ण झालेल्याला प्राधान्य दिले जाईल.