नवी दिल्ली: दिल्लीतील करोनाग्रस्त रुग्णांच्या सोयीसाठी रेल्वेने नऊ रेल्वे स्थानकांवर पाचशे तीन डबे तैनात केले आहेत. दिल्लीत करोनाग्रस्तांसाठी रुग्णालयातील जागा कमी पडू लागल्याने ही उपाययोजना करण्यात आली आहे. रेल्वेने अशा पद्धतीने देशभरात एकूण 960 कोचेस करोनाग्रस्तांसाठी तैनात केले आहेत.
दिल्लीत जे कोचेस तैनात करण्यात आले आहेत त्यातील 267 डबे आनंदविहार स्थानकावर, 30 डबे आदर्शनगर स्थानकावर, 21 डबे सफदरजंग स्थानकावर, प्रत्येकी 13 डबे तुघलकाबाद, आणि शहादरा स्थानकावर आणि 26 डबे पटेल नगर स्थानकावर तैनात ठेवण्यात आले आहेत.
दिल्लीच्या बाहेर 372 डबे उत्तरप्रदेशात, 60 तेलंगणात, 20 आंध्रप्रदेशात आणि पाच डबे मध्यप्रदेशात तैनात करण्यात आल्याची माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.