रायगड : रायगड-महाड जवळ दरड कोसळल्याची घटना समोर आहे. त्यामुळे महाड विन्हेरे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. दरड बाजूला करण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरु आहे. कुर्ला धरणाजवळ तिसऱ्यांदा दरड कोसळली आहे.
सध्या पावसाळ्याच्या दिवसांमुळे ठिकठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना समोर येत आहेत. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु वाहतूक समस्या निर्माण झाली असून ती सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरु आहे.