शिक्रापूर- सणसवाडी (ता. शिरूर) येथील एका दारू विक्री अड्ड्यावर शिक्रापूर पोलिसांनी छापा टाकत कारवाई केली आहे. यावेळी7 हजार रुपयांची दारू जप्त करत दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांनी दिली.
सणसवाडी येथील मुख्य चौकात वर्षा बियर शॉपी जवळील मोकळ्या जागेमध्ये काही व्यक्ती दारूची बेकायेशीरपणे विक्री करत होते. त्याची माहिती शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांना मिळाली. त्यांनतर पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार, पोलीस हवालदार दत्तात्रय शिंदे, पोलीस नाईक ब्रम्हा पोवार, विलास आंबेकर, पोलीस शिपाई विकास मोरे यांनी त्या ठिकाणी छापा टाकला. त्या ठिकाणी गणेश लक्ष्मण बालगुडे व रामभाऊ दरेकर दोघे (रा. सणसवाडी ता. शिरूर) हे दारू विक्री करत असल्याचे दिसून आले.
याबाबत पोलीस शिपाई विकास बाबासाहेब मोरे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली. त्याच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुढील तपास पोलीस पोलीस हवालदार दत्तात्रय शिंदे हे करीत आहेत.