तंबाखूपासून तयार केलेल्या लसीची चाचणी

पानातील प्रोटिन उपयोगी; ब्रिटनच्या संशोधकांचा दावा

लंडन :- करोनाचा धोका असताना तंबाखूजन्य पदार्थांवरही बंदी लावली गेल्याचे आपण पाहिले आहे. मात्र, ब्रिटिनमधील संशोधकांकडून याच तंबाखूपासून करोनावर लस विकसित करण्याचे प्रयत्न्‌ सुरू आहेत. ब्रिटनमध्ये तंबाखूपासूनच करोनाला अटकाव करणारी लस विकसित करण्यात येत आहे. या लशीची लवकरच मानवी चाचणी सुरू होणार आहे.

ब्रिटिश अमेरिकन टोबॅको या कंपनीशी संबंधित कंपनीने करोनावरील लस विकसित करण्याचा प्रयत्न सुरू केला होता. लवकरच या लसीची मानवी चाचणी होणार असून त्यासाठी कंपनीने अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाकडे परवानगी मागितली आहे.

ही लस तंबाखूच्या पानापासून बनवण्यात आली आहे. तंबाखूच्या पानातून काढण्यात आलेल्या प्रोटिनमधून लस तयार करण्यात आली असून मानवी चाचणीसाठीही परवानगी मिळेल असा विश्‍वास संशोधकांनी व्यक्‍त केला असून प्री-क्‍लिनिकल चाचणीतून याचे सकारात्मक परिणाम समोर आल्याचा दावाही करण्यात आला आहे. तंबाखूच्या पानातील प्रोटिन काढून त्याला करोना लशीच्या जीनोमसोबत एकत्र करत अत्याधुनिक पद्धतीने ही लस तयार करण्यात आली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.