नवी दिल्ली – काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी संविधानाची प्रस्तावना असलेले पेज ट्विट करत बुलडोझरचा फोटो शेअर केला आहे.यावेळी त्यांनी सरकारने गरीब आणि अल्पसंख्याकांना लक्ष्य केले आहे. या सगळ्यांपेक्षा भाजपने मनातील द्वेष नष्ट करायला हवा, असे राहुल गांधी यांनी म्हंटले आहे. दिल्लीमध्ये सध्या अतिक्रमण कारवाई सुरु आहे.
This is a demolition of India’s constitutional values.
This is state-sponsored targeting of poor & minorities.
BJP must bulldoze the hatred in their hearts instead. pic.twitter.com/ucSJK9OD9g
— Rahul Gandhi (@RahulGandhi) April 20, 2022
दरम्यान, दिल्लीच्या दंगलग्रस्त जहांगीरपुरीतल्या अनधिकृत बांधकामांवरती आजपासून पोलिसांच्या मदतीने पालिकेने कठोर करवाईला सुरूवात केली आहे. येथील अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर फिरवला. पण न्यायालयाच्या आदेशांनंतर ही कारवाई थांबली. पण दिल्लीतील आजच्या कारवाईवर राहुल गांधींनी जोरदार टीका केली.राहुल गांधी यांनी संविधानाची प्रस्तावना असलेले पेज ट्विट करत बुलडोझरचा फोटो शेअर केला आहे “संविधानातील मूल्यांवर हा बुल्डोजर चालवलं जात आहे. याचा उद्देश हा गरीब आणि अल्पसंख्यांकांना लक्ष्य करणे हा आहे. भाजपने आता त्यांच्या हृदयात वसलेल्या तिसस्कारावर बुल्डोजर चालवला पाहिजे.”
काय आहे प्रकरण
जहांगीरपुरी भागातील अनधिकृत बांधकामावर कारवाई
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा या कारवाईला विरोध
सर्वोच्च न्यायालयाचा स्थगिती देण्याचा आदेश
या आदेशानंतरही देऊनही महापालिकेकडून अतिक्रमण पाडण्याची कारवाई सुरू
मशिदीजवळील अतिक्रमण तोडण्याचं काम सुरू