टी-२० विश्वचषक २०२२ मध्ये आत्तापर्यंत टीम इंडियाची कामगिरी चांगली राहिली आहे. पाकिस्तान, नेदरलँड आणि बांगलादेशचा पराभव करत टीम इंडियाने उपांत्य फेरीत जवळपास स्थान मिळवले आहे. सुपर-१२ च्या फेरीत भारताने तीन सामने जिंकले असून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताला पराभवाला सामोरे जावे लागले होते. यानंतर आता भारतीय संघाचा पुढील सामना ६ नोव्हेंबरला झिम्बाब्वेविरुद्ध होणार आहे.
बांगलादेशचा विराट कोहलीवर ‘फेक फिल्डिंग’चा आरोप; नेमकं प्रकरण काय आणि नियम काय सांगतो?
सध्या या स्पर्धेत टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहली जबरदस्त लयीत खेळत आहे. बांगलादेशविरुद्ध त्याने नाबाद ६४ धावा केल्या होत्या. कोहलीला भारत विरुद्ध बांगलादेश सामान्यातील दमदार कामगिरीसाठी सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. यंदाच्या टी-२० विश्वचषकातील ४ सामन्यांमध्ये विराटने अनुक्रमे ८२*, ६२*, १२, ६४* अशा धावा केल्या आहेत. यामध्ये तो तीन सामन्यात अर्धशतकांसह नाबाद राहिला आहे.
दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ‘भारत जोडो यात्रेत’ एका मुलासोबत मनसोक्त क्रिकेट खेळले. काँग्रेसने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर राहुल गांधींचा क्रिकेट खेळतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. २ नोव्हेंबर रोजी राहुल गांधींची ‘भारत जोडो यात्रा’ हैदराबादच्या पटाचेरुवू येथे पोहोचली होती. व्हिडिओमध्ये भारतीय संघाची जर्सी घातलेला एक मुलगा राहुल गांधींसोबत क्रिकेट खेळत आहे. त्याचबरोबर राहुल गांधींनी भारतीय संघाला विश्वचषकासाठी शुभेच्छाही दिल्या.
You see, what donning the India jersey does to you – makes you unbeatable 😊❤️
Well played #TeamIndia! 🇮🇳 pic.twitter.com/al8kTylXn3
— Rahul Gandhi (@RahulGandhi) November 2, 2022
राहुल गांधी त्यांच्या तंदुरुस्त फिटनेससाठी ओळखले जातात. भारत जोडो यात्रेदरम्यान त्यांचा एक शर्यतीत धावण्याचा व्हिडिओ समोर आला होता. यावेळीही ते एका मुलासोबत क्रिकेट खेळात गोलंदाजी करताना दिसले. यावेळी भारत जोडो यात्रेत सहभागी कार्यकर्तेही क्रिकेट खेळताना दिसले.