“पटाखा’ फेम अभिनेत्री राधिका मदान हिने आपल्या आगामी “शिद्दत’ चित्रपटाचे शूटिंग सुरू केले आहे. याबाबत राधिका मदान हिने आपल्या सोशल मीडिया हॅंडल दिले आहे. राधिकाने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक क्लॅपबोर्डसोबतचा फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबत तिने लिहिले आहे की, “आणखी एक प्रवास सुरु आणि एक वेगळा अनुभव.’ ही पोस्ट करत तिने चित्रपटाचे डायरेक्टर आणि प्रड्यूसरसह अन्य लोकांना टॅग केले आहे.
“शिद्दत’ चित्रपटाचे दिग्दर्शन कुणाल देशमुख करत असून दिनेश विजान हे निर्मिती करत आहे. या चित्रपटात राधिका मदानसह सनी कौशल, डायन पॅंटी आण मोहित रैना आदी कलाकार मुख्य भुमिका साकारत आहेत.
दरम्यान, राधिका मदान हिने नुकतेच “अंग्रेजी मीडियम’ या कॉमिडी चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. हा चित्रपट 2017मध्ये प्रदर्शित झालेल्या “हिंदी मीडियम’चा सीक्वल आहे. या चित्रपटात इरफान खान आणि करीना कपूर मुख्य भूमिका साकारत आहे.