नवी दिल्ली – उत्तर प्रदेशमधील विधानसभेसाठीचे भाजपचे उमेदवार रघुवेंद्र प्रताप सिंह यांना जातीयवाचक वक्तव्य केल्याबद्दल निवडणूक आयोगाने त्यांना नोटीस बजावली आहे.
“जे हिंदू दुसऱ्या बाजूला मतदान करतात, त्यांच्या धमन्यांमध्ये मुस्मिमांचे रक्त असते.’ असे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले होते. त्यांनी भोजपुरी भाषेतून केलेल्या या आक्षेपार्ह वक्तव्याची एक व्हिडीओ क्लीप व्हायरल झाली आहे. निवडणूक आयोगाने या वक्तव्याचा लेखी अर्थही मागवून घेतला आहे.
रघुवंश प्रताप सिंह हे उत्तर प्रदेशातील दोमारीयागंज या मतदार संघातून भाजपकडून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्याविरोधात भारतीय दंड सिंहितेच्या विविध कलमांखाली आणि निवडणूक आचार संहितेच्या काही नियमांचा भंग केल्याबद्दल यापूर्वीच गुन्हे दाखल झाले असल्याचे निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आले आहे.