मुंबई : भाभा ऍटोमिक रिसर्च सेंटर (BARC) मधील एका वैज्ञानिक अधिकाऱ्याने कथित स्वरुपात पत्नीसोबत वाद झाल्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या केली. मिळालेल्या माहितीनुसार ही घटना गुरुवारची असून मृताचं नाव अनुज त्रिपाठी आहे.
ट्रॉम्बे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सिद्धेश्वर गोवे यांनी सांगितलं की, गुरुवारी सकाळी त्रिपाठी यांचं अणुशक्तीनगरस्थित आपल्या घऱी पत्नीसोबत मुलांला जेवण भरवण्यावरुन खूप भांडण झालं होतं. त्यानंतर काही वेळाने ते बेडरुणमध्ये टॉवेलच्या सहाय्याने पंख्याला लटकलेल्या अवस्थेत दिसले.
त्रिपाठी यांची पत्नी आणि शेजाऱ्यांनी त्रिपाठी यांना रुग्णालयात नेले. येथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात याबाबत प्रकरण दाखल करण्यात आलं आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे. मागील काही दिवसांपासून आत्महत्येच्या प्रकरणात वाढ झाली आहे. करोनाच्या लॉकडाऊनमध्ये अनेकांना मानसीक आजारांच्या समस्या जाणवत आहे. त्यामुळे देखील आत्महत्यांचे प्रकरणं वाढल्याचा एक मतप्रवाह आहे.