कोलंबो – श्रीलंकेत अराजकासारखी आणि असंतोषाची स्थिती निर्माण झाल्याने त्या देशाचे अध्यक्ष गोटाबाये राजपक्षे 13 जुलैला राजीनामा देणार आहे. त्यानंतर श्रीलंकन संसद 20 जुलैला नव्या अध्यक्षांची निवड करेल.
श्रीलंकेवर आर्थिक आपत्ती कोसळल्यानंतर मेटाकुटीला आलेल्या जनतेच्या संतापाचा उद्रेक झाला. त्यातून त्या देशात आंदोलनांचा भडका उडाला. एवढेच नव्हे तर, जनतेने थेट अध्यक्षांचे निवासस्थानच ताब्यात घेतले. जनतेच्या उठावामुळे दबावाखाली आलेल्या राजपक्षे यांनी राजीनाम्याची तयारी दर्शवली.
मात्र, पलायन करून त्यांनी अज्ञातस्थळी आश्रय घेतला आहे. त्यामुळे ते खरोखरीच राजीनामा देणार का याविषयी संभ्रमाची स्थिती निर्माण झाली. त्यापार्श्वभूमीवर, संसद सभापतींच्या कार्यालयाने राजपक्षे राजीनामा देणार असल्याच्या वृत्तावर शिक्कामोर्तब केले. राजपक्षे यांनी परदेशात आश्रय घेतल्याच्या चर्चांनाही उधाण आले आहे.
पावसाळी अधिवेशनापूर्वी सरकारने बोलावली सर्वपक्षीय बैठक; 18 जुलैपासून अधिवेशन होणार सुरु
मात्र, सभापती कार्यालयाने त्या चर्चा फेटाळून लावत राजपक्षे श्रीलंकेतच असल्याचे स्पष्टीकरण दिले. आर्थिक आपत्तीनंतर श्रीलंकेत उद्भवलेली राजकीय अस्थिरता रोखण्यासाठी सर्वपक्षीय सरकारचा पर्याय पुढे आला आहे. तसे सरकार स्थापन करण्यासाठी आता श्रीलंकेतील राजकीय पक्षांनी हालचाली सुरू केल्या आहेत.
अग्निपथ योजनेच्या विरोधात दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान याचिका