दोनेस्क आणि लुहांस्क हे दोन प्रांत युक्रेनमधून फुटून स्वतंत्र झाल्याची द्वाही रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी फिरवली आहे. या प्रांतांच्या स्वायत्ततेला मान्यता देत असून तिथे शांतता राखण्याच्या दृष्टीने रशियन फौजा रवाना करणार असल्याचे त्यांनी काल दूरचित्रवाणीवरुन देशाला संबोधित करताना सांगितले.
या हूकूमनाम्यावर स्वाक्षरी करण्यापूर्वी त्याची माहिती पुतीन यांनी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉ आणि जर्मनीचे चॅन्सेलर ओलाफ स्कोल्झ यांच्याशी दूरध्वनीवरुन बोलताना दिली होती आणि त्यावर त्या दोघांनी नाराजी व्यक्त केली होती असे रशियाच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.