सासवड – पुरंदर किल्ल्यावर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आमदार संजय जगताप व सभापती नलिनी लोळे, प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड, तहसीलदार रुपाली सरनोबत, अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अभिवादन करण्यात आले.
पुरंदरेश्वराच्या शिवालयात पूजा व छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी जन्मस्थळ ठिकाणी संभाजी महाराजांच्या पुतळ्याची पूजा करून अभिवादन करण्यात आले. जिल्हा परिषद व पंचायत समितीतर्फे परवानगी घेऊन शासकीय पातळीवर जयंती साजरी केली.
यावर्षी करोनाच्या सावटामुळे शंभू भक्तांची निराशा झाली होती. यावेळी जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय झुरंगे, गटशिक्षणाधिकारी मोहन गायकवाड, कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस गणेश जगताप, संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष राजाभाऊ जगताप, केंद्रप्रमुख राजेंद्र जगताप, शिक्षक नेते नंदकुमार चव्हाण आदी उपस्थित होते.