पुणे – करोनाबाधितांची संख्या चार हजारांपेक्षा कमी आल्याने शनिवारी दिलासा मिळाला, रविवारी पुन्हा बाधितांची संख्या चार हजारांच्या पुढे गेली. नव्या बाधितांमुळे बाधितांच्या संख्येने आता चार लाखांचा टप्पा ओलांडला. 24 तासांत 4 हजार 631 बाधितांची नोंद झाली.
आजपर्यंत 4 लाख 117 बाधितांची नोंद झाली असून, त्यातील 3 लाख 44 हजार 330 जण बरे झाले आहेत. त्यामध्ये गेल्या 24 तासांत डिस्चार्ज झालेल्या 4 हजार 759 बाधितांचा समावेश आहे. एकूण बाधितांमधील 49 हजार 289 बाधीत सक्रीय असून, त्यातील 1 हजार 369 बाधितांची प्रकृती गंभीर आहे. तर 6 हजार 619 रुग्ण ऑक्सिजनवर आहेत.
आजपर्यंत 6 हजार 498 जणांचा मृत्यू झाला आहे; त्यात गेल्या 24 तासांतील 55 मृतांचा समावेश आहे. अन्य मृत पावलेले 21 बाधित हे पुण्याबाहेरील आहेत त्यामुळे दिवसभरात एकूण 76 बाधितांचा मृत्यू झाला आहे.