पुणे – भामा आसखेड पाणीपुरवठा प्रकल्पाअंतर्गत विमाननगर टाकीचे स्थापत्यविषयक देखभाल दुरूस्तीचे काम केले जाणार आहे. महापालिकेचा पाणीपुरवठा विभाग हे काम करणार आहे. त्यामुळे या टाकीअंतर्गत होणारा पाणीपुरवठा गुरुवारी दि. 3 रोजी बंद ठेवण्यात येणार आहे.
शुक्रवारी सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. यात प्रामुख्याने संजय पार्क, संपूर्ण विमाननगर, म्हाडा कॉलनी, एसआरए भाग, कुलकर्णी गॅरेज भाग, यमुनानगर, राजीव गांधीनगर उत्तर व दक्षिण परिसरात पाणीपुरवठा बंद असेल.