पुणे – महापालिकेकडून आज पासून मंगळवार (दि. १५) पर्यंत पर्वती जलकेंद्राचे अखत्यारीतील पर्वती LLR टाकीचे मुख्य जलवहिनीच्या देखभाल दुरुस्तीचे काम केले जाणार आहे.
त्यामुळे शहराच्या पेठाच्या परिसरात पुढील चार दिवस सकाळी कमी दाबाने पाणी पुरवठा केला जाणार असल्याची माहिती पालिकेकडून कळविण्यात आली आहे.
तरी सर्व नागरिकांनी याबाबत नोंद घेऊन सहकार्य करावे असे आवाहन पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने केले आहे.
पाणी पुरवठा बाधित होणारा भाग :
पर्वती (LLR) जलकेंद्र परिसर :- शहरातील सर्व पेठा, दत्तवाडी परिसर, राजेंद्र नगर, लोकमान्य नगर,डेक्कन परिसर, शिवाजीनगर परिसर, स्वारगेट, पर्वती दर्शन, मुकुंद नगर, भवानी पेठ व नाना पेठ