पुणे : तीन पिस्तूलासह नऊ काडतूसे बाळगणाऱ्या दोघांना अटक

पुणे – देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्या दोघा सराईत गुन्हेगारांना दरोडा व वाहनचोरी विरोध पथकाने जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून तीन पिस्तूले , एक मॅगझीन आणी नऊ काडतूसे हस्तगत करण्यात आली आहेत.

निलेश दत्तात्रय शिर्के(29,रा.सांगवी सांडस, ता. हवेली), राहुल गणपत ढवळे(29,रा.दौंड) अशी अटक आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक(1) सिंहगड रस्ता परिसरात गस्त घालत होते. तेव्हा पोलीस अंमलदार सुमित ताकपेरे यांना खबर मिळाली की, सावित्री गार्डन मंगल कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्याकडील मोकळ्या मैदानावर आरोपी पिस्तूल घेऊन थांबले आहेत.

त्यानूसार सापळा रचून आरोपींना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या अंगझडतीत पिस्तूल व काडतूसे सापडली. त्यांच्याविरुध्द आर्म ऍक्‍ट अंतर्गत सिंहगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिल्पा चव्हाण, सहायक पोलीस निरीक्षक जुबेर मुजावर, फौजदार शाहिद शेख, दिलीप जोशी, अंमलदार निलेश शिवतरे, अतुम मेंगे, गणेश पाटोळे, सुमित ताकपेरे, ऋषीकेश कोळप, चेतन होळकर यांच्या पथकाने केली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.