प्रभात वृत्तसेवा
पुणे – लाडक्या गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला पुणे शहरात भाविकांनी अलोट गर्दी होते. त्यामुळे शहरात येणाऱ्या वाहनांना वाहतुकीसाठी बंदी करण्यात येते. विसर्जन मिरवणूक शांततेने, सुरळीत आणि सुरक्षित पार पडावी तसेच वाहतूक सुरळीत चालावी, यासाठी आज रात्रीपासून वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. तसेच मुख्य मिरवणूक सकाळी नऊ वाजता सुरू होणार असल्याने वाहतूक मार्गामध्ये बदल करण्यात आला आहे. तर मुख्य मार्गावरील रस्ते बंद ठेवण्यात आले आहे.
शुक्रवारी सकाळी 7 ते 10 सप्टेंबर रोजी मिरवणूक संपेपर्यंत असा असेल बदल
वाहतुकीसाठी बंद असलेले रस्ते
शिवाजी रोड : काकासाहेब गाडगीळ पुतळा जंक्शन ते जेधे चौक
लक्ष्मी रोड : संत कबीर चौकी ते अलका टॉकीज चौक
बगाडे रोड : सोन्या मारूती चौक ते फडके हौद चौक
बाजीराव रोड : बजाज पुतळा चौक ते फुटका बुरूज चौक
कुमठेकर रोड : टिळक चौक ते चितळे कॉर्नर चौक
गणेश रोड : दारूवाला पुल ते जिजामाता चौक
केळकर रोड : बुधवार चौक ते अलका टॉकीज चौक
गुरु नानक रोड : देवजीबाबा चौक ते हमजेखान चौक ते गोविंद हलवाई चौक
टिळक रोड : जेधे चौक ते टिळक चौक
शास्त्री रोड : सेनादत्त चौकी चौक ते अलका टॉकीज चौक
जंगली महाराज रोड : झाशी राणी चौक ते खंडोजी बाबा चौक
कर्वे रस्ता : नळ स्टॉप चौक ते खंडोजी बाबा चौक
फर्ग्युसन रोड : खंडोजी बाबा चौक ते फर्ग्युसन कॉलेज मेनगेट
भांडारकर रस्ता : पी. वाय. सी जिमखाना ते गुडलक चौक ते नटराज चौक
पुणे-सातारा रोड : व्होल्गा चौक ते जेधे चौक
सोलापुर रोड : सेव्हन लव्हज चौक ते जेधे चौक
प्रभात रोड : डेक्कन पोस्ट ते शेलारमामा चौक
वाहतूक वळविण्यात आलेले मार्ग
– जंगली महाराज रोड : झाशी राणी चौक
– शिवाजी रोड : स. गो. बर्वे चौक / गाडगीळ पुतळा
– मुदलीयार रोड : अपोलो टॉकीज
– नेहरु रोड : संत कबीर पोलीस चौकी
– सोलापूर रोड : सेव्हन लव्हज चौक
– सातारा रोड : व्होल्गा चौक
– बाजीराव रोड : पुरम चौक
– लाल बहादुर शास्त्री रोड : सेनादत्त पोलीस चौकी
– कर्वे रोड : नळस्टॉप
– फर्ग्युसन कॉलेज रोड : गुडलक चौक