पुणे – चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या पेरिविंकल इंग्लिश मिडीयम स्कुल अँड ज्युनियर कॉलेजच्या सुस शाखेत आज ख्रिसमस ईव्हच्या निमित्ताने वाढत्या थंडीचे व नवीन वर्षाच्या स्वागताचे औचित्य साधून विदयार्थी व शिक्षकांसाठी बॉनफायर म्हणजेच शेकोटीचे आयोजन केले होते.
नुकतीच परीक्षा संपून नाताळच्या सुट्ट्या लागण्याआधी विदयार्थ्यांनी या वर्षभरात केलेल्या परिश्रमाची व मेहनतीची दाद म्हणून त्यांना शेकोटीच्या बाजूला गेम्स, गाणी, अंताक्षरी असे नानाप्रकारचे खेळ घेऊन या वर्षाला गुड बाय करून नवीन वर्षाच्या आगमनासाठी विद्यार्थ्यांनी व शिक्षकांची पालकांसमवेत शाळेत संध्याकाळी खास शेकोटी रंगली होती.
सर्वांनी एकत्र येऊन सण साजरा करणे व येणाऱ्या थंडीची तमा न बाळगता सर्व वाईट आठवणी, विचार, रोगराई या शेकोटी बरोबर निघून जाऊन नवीन चैतन्य, उत्साह व जोमाने नवीन वर्ष असावे हे या शेकोटीचे उद्दिष्ट होते.यावेळी शाळेचे संस्थापक अध्यक्ष मा.राजेंद्र बांदल सर, संचालिका रेखा बांदल व यश बांदल यांनी या शेकोटीच्या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती दर्शविली. सर्व विद्यार्थी व शिक्षक यांचा यात सक्रिय सहभाग होता.
या उपक्रमामुळे भारतीय संस्कृतीचे पालन होऊन नाताळ सणाचे महत्व देखील विदयार्थ्यांना समजले.या उपक्रमातून विदयार्थ्यांमध्ये सांघिक व सर्व धर्म समभाव निर्माण करण्याचा एक प्रयत्न व राष्ट्रीय एकात्मता जपण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आले.
या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.निर्मल पंडित यांच्या अध्यक्षतेखाली व मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षिका शुभा कुलकर्णी, सचिन खोडके, सन्मती चौगुले व ज्योती यांच्या सह सर्व शिक्षकवृन्द यांच्या सहयोगाने तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांच्या मदतीने अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने व उत्साहाने करण्यात आले होते. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन प्रायमरी इन्चार्ज ज्योती भादोरिया यांनी केले.