पुणे- करोनाबाधितांची संख्या कमी झाल्याने राज्य शासनाच्या सुधारीत आदेशानुसार शहरातील काही निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. त्यानुसार आता शहरातील उद्याने सकाळी आणि सायंकाळीही सर्वासाठी सुरू राहणार आहेत. महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी याबाबतचे सुधारित आदेश बुधवारी काढले आहेत. महापालिकेस पुणे आणि कॅन्टोन्मेंट बोर्डांसाठी लागू असणार आहेत, असे आयुक्तांनी आदेशात म्हटले आहे.
काय आहेत सुधारित आदेश
*स्पा, सलून, ब्युटी पार्लर आसन क्षमतेच्या 50 टक्के क्षमतेने सुरू राहतील.
*अंत्यसंस्कारांसाठी उपस्थितीवर निर्बंध नसतील.
*विवाह समारंभ खुल्या जागेत क्षमतेच्या 25 टक्के तर बंदिस्त जागेत 350 नागरिक यापैकी जे कमी असेल, अशा संख्येच्या उपस्थितीत साजरे करता येतील.
*उद्याने संध्याकाळी 6 ते रात्री 9 पर्यंत सुरू राहतील.
*मनोरंजन पार्क, थीम पार्क, जलतरण तलाव, वॉटर पार्क
50 टक्के क्षमतेने सुरू राहतील.
*रेस्टॉरंट, हॉटेल्स, सिनेमागृह व नाट्यगृह आसनक्षमतेच्या 50 % क्षमतेने सुरू ठेवता येतील. सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम हॉल, मंडपाच्या आसन क्षमतेच्या 50 टक्के क्षमतेने सुरू राहतील.