सातारा -तब्बल तीन कोटी चार लाख रुपये घेवूनही तिघांनी एका व्यापाऱ्याच्या नावावर फ्लॅट करुन दिला नाही. तसेच “तुझा पाच लाखांमध्ये कार्यक्रम करेन. तुला व तुझ्या कुटुंबास जीवंत सोडणार नाही’ अशी धमकीही दिली. दि. 15 मे 2018 ते मार्च 2021 या दरम्यान हा प्रकार घडला असून, या प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
मनोज गणपती महापरळे (वय 44, रा. तारळे, ता. पाटण, सध्या रा. जयभवानीनगर, कोडोली, ता. सातारा) यांनी फिर्याद दिली असून, विजय वसंतराव चौधरी, अजिंक्य चौधरी, कल्पना विजय चौधरी (रा. देशमुख कॉलनी, सदरबझार, सातारा) यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादीत नमूद केले आहे की, संशयित विजय चौधरी यांनी वेळोवेळी एक कोटी 92 लाख रुपये व प्लॉटचे 50 लाख रुपये असे दोन कोटी 42 लाख रुपये व्याजाने देवून त्यापोटी तीन कोटी चार लाख 77 हजार 500 रुपये व्याज व मुद्दल घेतली. तरीसुध्दा ठरल्याप्रमाणे प्लॉट नावे करुन दिला नाही. तसेच तारण म्हणून घेतलेले 65 तोळे सोन्याचे दागिनेही परत न करता व्याजाची, मुद्दलाची मागणी करत आहेत.
(पान 2)8