पुणे – नवनियुक्त आयपीएस अधिकारी अंकित गोयल यांनी रविवारी (दि. ३०) पुणे जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक म्हणून पदभार स्विकारला. मावळते पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्याकडून त्यांनी सुत्रे हाती घेतली.
अंकित गोयल यांची राज्य शासनाने पुणे जिल्ह्याच्या अधिक्षकपदी नियुक्ती केली होती. यापुर्वी ते गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक होते. गडचिरोली जिल्ह्यात कार्यरत असताना त्यांनी नक्षलवादी चळवळ मोडीत काढण्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या काळात अनेक नक्षलवादी शरण आले होते. वंचित घटकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी विशेष उपक्रम सुरू केले होते. त्यांच्या या कामगिरीचे शासनाकडून कौतून करण्यात आले होते.
नक्षलवादी भागात केलेल्या कार्यामुळे गडचिरोली पोलीस दलात कार्यरत पोलीस अधिकारी, कर्मचार्यांना शासनाची विवीध पदाने गौरविण्यात आले आहे. यामध्ये गोयल यांच्या कामगिरीचा मोठा वाटा आहे. आगामी जिल्हा परिषद निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या ग्रामिण भागात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी गोयल यांच्यासमोर आव्हान असणार आहे.