IND vs SA – भारतीय संघाला आज फलंदाजीत खास कामगिरी करता आलेली नाही. सूर्यकुमार यादव सोडला तर भारतीय संघाच्या इतर कोणत्याही फलंदाजाला मोठी खेळली करता आली नाही. भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर १३३ धावांचे लक्ष्य ठेवले होते. आफ्रिकेच्या लुंगी एनगिडीने भारतीय फलंदाजांना चांगलाच त्रास दिला. त्याने चांगली गोलंदाजी करता भारताच्या ४ गाड्यांना तंबूत पाठवले होते. प्रत्युत्तरात भारतीय संघानेही दमदार गोलंदाजी केली. अर्शदिप सिंगने एकाच षटकात दोन फलंदाजांना तंबूत पाठवले होते. मात्र सामन्यात क्षेत्ररक्षणादरम्यान भारतीय खेळाडूंकडून बऱ्याच चुका घडल्या.
#ViratKohli | विराट कोहलीच्या नावावर ‘या’ खास विक्रमाची नोंद, अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय
भारतीय संघाच्या खराब क्षेत्ररक्षणाचा फायदा घेत दक्षिण आफ्रिकेने ५ गडी राखून हा सामना जिंकला आहे. सामन्यात सुरुवातीपासूनच साऊथ आफ्रिकेच्या वेगवान गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांवर वर्चस्व मिळवले. कारण भारतीय संघाच्या ४९ धावांवरच ५ गडी बाद झाले होते. यानंतर सूर्यकुमार यादवने भारताच्या डावाला सावरले. मात्र दुसऱ्या बाजूने भारताच्या कोणत्याही फलंदाजाला मैदानावर जास्त वेळ टाकता आले नाही. दिनेश कार्तिककडून मोठ्या अपेक्षा असताना तो फक्त ६ धावांवरच बाद झाला. सूर्यकुमार यादवने एकाकी झुंज देत ४० चेंडूत ३ षटकार आणि ६ चौकारांसह ६८ धावांची खेळी खेळली. आफ्रिकेकडून गोलंदाजीत लुंगी एनगिडी ४ आणि वेन पार्नेल याने ३ बळी घेतले. तर अॅनरिक नॉरकीयने १ गडी बाद केला.
आफ्रिकेला ६० चेंडूंत ९४ धावा विजयासाठी करायच्या होत्या. आर अश्विनच्या चेंडूवर मार्कराने मारलेला फटका विराटला सहज टिपता आला असता, पण त्याच्याकडून झेल सुटला. यानंतर एडन मार्कराम व डेव्हिड मिलर ही जोडी मैदानावर खेळत असताना मार्करामला धावबाद करण्याची चांगली संधी होती मात्र, रोहितला त्याला धावबाद करता आले नाही. मार्कराम बराच लांब होता आणि रोहितच्या डायरेक्ट हिटने आफ्रिकेला अडचणीत आणले असते. मात्र खराब क्षेत्ररक्षणामुळे भारताला पराभव स्वीकारावा लागला. त्या दोन्ही चुका खेळाडूंनी केल्या नसत्या तर सामान्याचा निकाल कदाचित वेगळा पाहायला मिळाला असता.
#TeamIndia fought hard but it was South Africa who won the match.
We will look to bounce back in our next game of the #T20WorldCup . 👍 👍
Scorecard ▶️ https://t.co/KBtNIk6J16 #INDvSA pic.twitter.com/Q6NGoZokuE
— BCCI (@BCCI) October 30, 2022