पुणे – शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पाच्या धरण साखळीत केवळ ४.०८ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. या प्रकल्पांतील पाणीसाठ्याचे हे प्रमाण अवघे १४.०१ टक्के इतके आहे. गतवर्षीच्या याच महिन्यात याच दिवशीची नोंदीनुसार यावर्षी हा पाणीसाठा १.४ टीएमसी इतका कमी आहे.
खडकवासला प्रकल्पात गेल्या वर्षीच्या आजच्या दिवशी ५.४८ टीएमसी पाणीसाठा शिल्लक राहिला होता. तर, गतवर्षीच्या उपलब्ध पाणीसाठ्याचे हे प्रमाण १८.७८ टक्के इतके होते.
खडकवासलातील पाणीसाठा (टीएमसीत)
– टेमघर – ०.०७ (०.१४)
– वरसगाव – १.६३ (२.७४)
– पानशेत – १.४५ (१.३७)
– खडकवासला – ०.९३ (१.२३)