पुणे – महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मिळकतकर थकबाकी वसुलीसाठी राबवलेल्या अभय योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात पालिकेचा अपेक्षाभंग झाला आहे. 1 कोटींपर्यंतच्या थकबाकीदारांसाठी राबविण्यात आलेल्या या योजनेतून केवळ 35 कोटींचा महसूल महापालिकेच्या तिजोरीत जमा हाला आहे. तर, पहिल्या टप्प्यात 109 कोटींचा महसूल मिळाला होता.
करोनामुळे महापालिकेचे उत्पन्नाचे स्रोत घटल्याने पालिकेकडून 2020-21 मध्ये अभय योजना राबविली होती. त्यात, पालिकेस सुमारे 486 कोटींचा महसूल मिळाला होता. त्यामुळे, प्रशासनाने यंदा पुन्हा ही योजना राबविण्याचा निर्णय घेतला. त्यात, पहिल्या टप्प्यात 109 कोटींचा महसूल मिळाला होता. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात ही योजना 1 कोटीपर्यंतच्या थकबाकीसाठी आणण्यात आली. मात्र, प्रशासनाने केवळ निवासी मिळकतींना सवलत देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, योजनेची मुदत 26 जानेवारीपर्यंत होती. ती वाढवून 28 फेब्रुवारी करण्यात आली होती. दुसऱ्या टप्प्यातील अभय योजनेतून महापालिकेला फक्त 35.50 कोटी मिळाले आहेत.जात आहे. दरम्यान, मिळकत करातून या आर्थिक वर्षात महापालिकेच्या तिजोरीत आतापर्यंत 1579.66 कोटी जमा झाले असून पालिकेचे हे विक्रमी उत्पन्न आहे.