Mohammed Shami, T20 World Cup 2024 : टी-20 विश्वचषकासाठी सर्व संघ सज्ज झाले आहेत. वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत होणाऱ्या या मेगा स्पर्धेसाठी सर्व संघ न्यूयॉर्कला पोहोचले आहेत. T20 विश्वचषक सुरू होण्यापूर्वी संघांमध्ये सराव सामने सुरू आहेत. या स्पर्धेत 20 संघ खेळताना दिसणार आहेत. सर्व संघांची चार गटात विभागणी करण्यात आली आहे. ज्यामध्ये 5-5 संघ ठेवण्यात आले आहेत.
या 4 गटातील प्रत्येकी दोन संघ सुपर 8 साठी पात्र ठरतील. सुपर-8 मध्ये कोणते संघ असू शकतात यासाठी अंदाज बांधणे सुरू झाले आहे. दरम्यान, मोहम्मद शमीनेही याबाबत एक भविष्यवाणी केली आहे.
शमीचे सुपर-8 संघ….
भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने त्याच्या यूट्यूब चॅनेलवर विश्वचषक संघांचे मूल्यांकन केले आणि संघांची निवड केली. टी-20 विश्वचषक संघाचा भाग नसलेल्या मोहम्मद शमीने ग्रुप ए मधून भारत-पाकिस्तान, ग्रुप बी मधून ऑस्ट्रेलिया-इंग्लंड, ग्रुप सी मधून न्यूझीलंड-वेस्ट इंडिज आणि ड गटातून दक्षिण आफ्रिका-श्रीलंका यांची निवड केली आहे. शमीने न्यूझीलंडला अफगाणिस्तानपेक्षा चांगले म्हटले. तो म्हणाला की, मला तिथे वेस्ट इंडिज हवे आहे आणि माझ्या मते अफगाणिस्तानही कमी नाही, पण मला त्यापेक्षा न्यूझीलंड संघ चांगला वाटला.
टी20 विश्वचषक 2024 चे स्वरूप कसे आहे…
आयसीसीने टी20 विश्वचषक 2024 मध्ये 20 संघांची चार गटात विभागणी करण्यात आली आहे. यानंतर प्रत्येक गटातून दोन संघ सुपर-8 साठी पात्र ठरतील. सुपर 8 संपल्यानंतर, गुणतालिकेतील अव्वल संघ उपांत्य फेरीत चौथ्या स्थानावर असलेल्या संघाचा सामना करेल आणि दुसऱ्या स्थानावर असलेल्या संघाचा सामना तिसऱ्या स्थानावरील संघाशी होईल. दोन्ही उपांत्य फेरीतील विजेते संघ 29 जून रोजी विश्वचषकाच्या अंतिम फेरीत आमने-सामने येतील.